-
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
-
किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते.
-
गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही.
-
शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने २२ एप्रिलला मोठ्या पडद्यावर येणार आहे.
-
‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत.
-
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या चित्रपटात राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची भूमिका साकारणार आहे.
-
श्रीमंत कान्होजीराजे जेधे यांची भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी साकारणार आहे.
-
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर या चित्रपटात बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारणार आहेत.
-
या चित्रपटात अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर, ईशा केसकर, ऋषी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.
-
‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांनंतर आता लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शेर शिवराज / इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार