-
ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनच्या आयुष्यात येण्या अगोदर अभिषकचे लग्न हे करिश्मा कपूरसोबत होणार होते, त्या दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, साखरपुड्याच्या काही काळानंतर त्यांचे नाते तुटले. या घटनेनंतर करीश्माची बहीण असलेल्या करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या बहिणीसोबत अभिषेक बच्चनचं नातं तुटल्यानंतर तिला अभिषेकबद्दल काय वाटत होतं.(सर्व फोटो- संग्रहीत)
-
करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी रेफ्युजी या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोघेही चांगले मित्रही होते.
-
अभिषेक बच्चन करीना कपूरच्या मित्रापासून तिचा भाऊजी होणार होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तेव्हा केवळ करिश्मा आणि अभिषेकचे ब्रेकअपच झाले नाही तर कपूर आणि बच्चन कुटुंबातील नातेही बिघडले.
-
करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांची मैत्रीही यातून सुटली नाही. या दोघांमधील संवादही थांबला होता.
-
मात्र सिमी ग्रेवालला दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की, दोन्ही कुटुंबातील संबंध बिघडले असले तरी अभिषेक बच्चनबद्दल माझ्या मनात अजूनही पूर्वीसारखीच भावना आहे.
-
ब्रेकअप झाल्यानंतर अभिषेक बच्चनने करीश्मा किंवा करीना कपूरसोबत कोणताही चित्रपट साईन केला नाही.
-
अभिषेकच्या मनातही माझ्याबद्दल पूर्वीसारख्याच भावना असतील, कोणत्याही प्रकारची कटुता आली नसेल. असा विश्वासही करीना कपूरने व्यक्त केला होता.