-
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
-
‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे.
-
‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे.
-
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो.
-
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते मुकेश रिषी हे नजरेत विखार असणाऱ्या अफजलखानाची भूमिका साकारत आहेत.
-
नुकतंच मुकेश रिषी यांनी या चित्रपटातील अफजल खानच्या भूमिकेबद्दल त्यांचे अनुभव काय होते? या चित्रपटात भूमिका साकारताना त्यांना काय अनुभव आला? याबाबत त्यांनी मत मांडले आहे.
-
“काही महिन्यांपूर्वी दिग्पाल लांजेकर यांनी मला या चित्रपटातील अफजल खान या पात्राच्या भूमिकेबाबत विचारले होते. त्यावेळी मी ही भूमिका साकारण्यासाठी फारच उत्सुक होतो”, असे मुकेश रिषी म्हणाले.
-
“दिग्पाल हा अतिशय अभ्यासू आणि मेहनती दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांनी या भूमिकेबाबत खूप अभ्यास केला होता”, असेही मुकेश रिषींनी म्हटले.
-
“दिग्पाल लांजेकर यांनी अफजलखान हा प्रेक्षकांसमोर कशाप्रकारे साकारायचा याबद्दलही फार माहिती गोळा केली होती”, असेही ते म्हणाले.
-
“याआधी मला एका इंग्रजी चित्रपटात याच भूमिकेबाबत विचारण्यात आले होते. मात्र त्याबाबत पुढे काहीच बोलणे झाले नाही”, असेही त्यांनी म्हटले.
-
“अफजलखान म्हटल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो तो दाढीवाला धिप्पाड देहयष्टी असलेला खलनायक. मी याआधी केलेल्या चित्रपटांमध्ये दाढीचा अजिबात वापर केलेला नाही. पण आता खूप वर्षानंतर या भूमिकेच्या निमित्ताने दाढीचा वापरली”, असेही ते म्हणाले.
-
“मी यापूर्वी कधीही अशी भूमिका साकारलेली नव्हती. पण या भूमिकेसाठी मला दाढी दाखवण्यात आली. त्यावेळी ती दाढी पाहून मला फार तणाव आला होता”, असेही ते म्हणाले.
-
“कारण दाढी असली की तुम्हाला एखादी भूमिका करताना फार त्रास होतो. मात्र या भूमिकेसाठी तसा गेटअप करणे आवश्यक होते. याची मला कल्पना होती. कारण या भूमिकेची खरी ओळख दाढीच होती”, असेही त्यांनी म्हटले.
-
“मला या चित्रपटासाठी एक महिनाअगोदरच स्क्रिप्ट देण्यात आली होती. त्यावेळी जेव्हा मी हे डायलॉग बोलत होतो, तेव्हा मला या भूमिकेची ताकद समजली होती”. असेही मुकेश रिषींनी सांगितले.
-
“मी उत्तर भारतीय असल्याने मला उर्दू भाषेची चांगली जाण आहे आणि ही भाषा मी चांगल्या प्रकारे बोलू शकतो. त्याचा मला काही ठिकाणी फायदा झाला”, असेही मुकेश रिषी म्हणाले.
-
“या चित्रपटात माझा लूक खूप क्रूर दाखवण्यात आला आहे. मी जेवढा क्रूर दिसेल तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उठावदार होईल हे मला माहिती होते. त्यामुळे मला माझ्या भूमिकेबाबत कुठलीच सहानुभूती नको होती”, असेही त्यांनी म्हटले.
-
“अफजलखानच्या भूमिकेमुळे प्रेक्षक माझा तिरस्कार करणार याची मला पूर्ण खात्री आहे. पण आजकाल सर्वांनाच या अभिनय क्षेत्राबाबत आणि पडद्यामागच्या गोष्टींबाबत माहीत झाले आहे”, असेही ते म्हणाले.
-
“माझ्या सोसायटीमधील अनेक लहान मुलं माझ्यासोबत खेळतात. त्यामुळे त्यांना माहिती झाले आहे की मी चित्रपटात काम करतो. माझ्या भूमिका खलनायक स्वरुपातील असतात, हे देखील त्यांना माहिती आहे”, असेही ते गमतीने म्हणाले.
-
“जर तुम्हाला या भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवायच्या असतील तर तुम्हाला त्या तितक्याच ताकदीने उभ्या कराव्या लागतात. मी या चित्रपटाचे पोस्टर माझ्या घरात लावणार आहे”, असेही ते म्हणाले.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”