-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं.
-
चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती. आज १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्न बंधनात अडकले आहेत.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो आलियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आलियाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्या दोघांनी ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
-
आलिया आणि रणबीरचे लग्नासाठी चार पंडितांनी मिळून मंत्रोच्चार केले.
-
विशेष म्हणजे सप्तपदी घेण्यापूर्वी गायत्री मंत्राचे पठणही करण्यात आले.
-
या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले आहेत.
-
आलियाने लग्नातील फोटो शेअर करत त्यांच्या दिलेल्या आशीर्वादाबद्दल सगळ्यांना आभारी असल्याचं म्हटलं आहे.
-
लग्नानंतर आलिया आणि रणबीरने सगळ्या फोटोग्राफर्सची भेट घेतली आहे.
-
रणबीर आणि आलिया मुंबईतील कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर कपूर कुटुंबीयांच्या प्रसिद्ध ‘आरके हाऊस’मध्ये सप्तपदी घेतली आहेत.
-
लग्नाचं ठिकाण हे रणबीरनं स्वतः ठरवलं आहे. रणबीर आणि त्याची आजी कृष्णा राज कपूर यांचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. त्याचे आई- वडील ऋषी कपूर आणि आई नीतू कपूर यांचं लग्नही याच आरके हाऊसमध्ये झालं होतं.
-
आलिया आणि रणबीरच्या लग्नात कुटूंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. (Photo Credit Alia Bhatt Instagram/ Alia Bhatt Fanpage)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित