-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चांना मागच्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. चाहत्यांना दोघांच्या लग्नाबाबत कमालीची उत्सुकता होती.
-
काल १४ एप्रिल रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण चर्चा होते ती आलियाच्या मंगळसूत्राची …
-
आज आपण अशाच काही अभिनेत्रींच्या अशाच चर्चेत असलेल्या मंगळसूत्रांविषयी जाणून घेऊया…
-
आलिया भट्ट- रणबीर आणि आलियाच्या लग्नाचं बोलायचं झालं तर रणबीरचा भाग्यांक हा ८ आहे. त्यामुळे आलियाच्या मंगळसूत्रात इंग्रजीतला 8 दिसला. इंग्रजीतील 8 अंक हा (Infinity symbol) इन्फिनिटी चिन्हासारखा दिसतो. या दोन कारणांमुळे आलियाच्या मंगळसूत्र ८ अंकामुळे चर्चेत आहे.
-
ऐश्वर्या राय बच्चन – ऐश्वर्या राय बच्चनचे मंगळसूत्र हे त्याच्या किंमतीमुळे चर्चेत होते. ऐश्वर्याच्या मंगळसूत्राची किंमत ही ४५ लाख रुपये आहे आणि त्यात हिऱ्याचे पेंडेंट आहे.
-
प्रियांका चोप्रा – प्रियांकाचं मंगळसूत्र हे सब्यसाची पारंपारिक ज्वेलर्सने डिझाइन केले आहे. या मंगळसूत्रात सोन्याची चेन होती, ज्यात चार काळे मणी आणि हिऱ्याचे पेन्डेंट होते.
-
कतरिना कैफ – कतरिना कैफने सब्यसाची बंगाल टायगर कलेक्शनचे हिरे जडलेले मंगळसूत्र, ज्यात काळे आणि सोन्याचे मणी आणि दोन छोटे ड्रॉप-डाउन हिरे होते.
-
शिल्पा शेट्टी – शिल्पा शेट्टीचे मंगळसूत्र हे चोकर नेकलेसचे सारखे आहे, त्यात हिऱ्याचं डायमंडचं पेंडेंट आहे.
-
यामी गौतम- यामी गौतमचे मंगळसूत्र हे सोन्याचे असून त्यात ६ काळे मणी आणि एक मोती आहे.
-
सोनम कपूर – सोनम कपूरचं मंगळसूत्र हे उशीता रावतानीचे आहे. तिच्या मंगळसूत्रात तीन पेंडेंट आणि काळे मणी आहेत.
-
सोनाली बेंद्रे – सोनाली बेंद्रेचे मंगळसूत्र हे यामी गौतम सारखेच आहे.
-
दीपिका पदुकोण – दीपिकाचे मंगळसूत्रात काळे मणी आणि डायमंड पेंडेंट होते. (Photo Credit : File Photo)
VIDEO: बापरे भयंकर अपघात! वाशीमध्ये भर रस्त्यात ट्रकचा टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं; रिक्षाची अवस्था बघून घाम फुटेल