-
‘ब्रम्हास्त्र: भाग १’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
बॉलिवूड दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
-
या चित्रपटाची स्टार कास्टही तगडी आहे.
-
बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
-
तर बॉलिवूडमधील नवविवाहित दाम्पत्य या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठया पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात एकत्र काम करताना दिसतील.
-
‘ब्रम्हास्त्र: भाग १’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयदेखील झळकणार आहे.
-
या चित्रपटात ती ‘दमयंती’ हे पात्र साकारणार आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी मौनीने तीन कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन ‘ब्रम्हास्त्र: भाग १’ चित्रपटात अजय वशिष्ठ हे पात्र साकारणार आहे.
-
हे पात्र साकारण्यासाठी त्याने ९ ते ११ कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे.
-
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
-
‘शिवा’ हे पात्र या चित्रपटात तो साकारणार आहे.
-
रणबीरने ‘ब्रम्हास्त्र: भाग १’ चित्रपटासाठी २५-३० करोड रुपये मानधन घेतले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात ‘तारा’ हे पात्र साकारताना दिसेल.
-
या भूमिकेसाठी तिने १०-१२ कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे.
-
अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे बिग बी अमिताभ बच्चन ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात ‘गुरु अरविंद’ या भूमिकेत आहेत.
-
मीडिया रिपोर्टनुसार, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटासाठी त्यांनी ८-१० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा