-
बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचे आयुष्य वादग्रस्त घटनांनी भरलेले आहे. संजय दत्तने अनेक चढउतार पाहिले, ज्याची सर्वांना जाणीव आहे. (Express archive photo)
-
संजय दत्तने त्याच्या आयुष्यातील चांगले आणि वाईट विशेषत: व्यसनाधीनतेचे अनुभव सांगताना कधीही मागे पुढे पाहिले नाही. (फोटो- इंस्टाग्राम duttsanjay)
-
संजय दत्तने अनेकदा सांगितले आहे की ड्रग्ज सोडणे त्याच्यासाठी किती कठीण होते. (Express archive photo)
-
रिहॅब सेंटरमधून परतल्यानंतर लोक त्याच्याशी कसे वागायचे हेही त्याने सांगितले आहे.
-
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाशी झालेल्या संभाषणात संजय दत्तने सांगितले की, त्यावेळी ड्रग्ज करणे त्याच्यासाठी ‘कूल’ होते. यावेळी त्याला त्याने स्वतःला अंमली पदार्थांच्या व्यसनातून कसे बाहेर काढले असे विचारण्यात आले. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
मला माझा निर्णय घ्यावा लागला. ड्रग्जच्या आहारी गेल्यावर तुम्ही एकटे पडते. माझीही तशी अवस्था झाली होती. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
संजय दत्तने सांगितले की जेव्हा त्याने रिहॅबमधील उर्वरित लोकांसह मजेदार खेळांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली तेव्हा मला जाणवले की आपण बरेच काही गमावले आहे.
-
मला वाटू लागलं की मी आयुष्यच गमावत होतो. मला वाटायचे की मी दहा वर्षे माझ्या खोलीत किंवा बाथरूममध्ये आहे. शूटिंगला जावंसं वाटत नव्हतं आणि अशा प्रकारे सर्वकाही बदलले, असे संजय दत्त म्हणाला (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
मला ते हाताळणे कठीण झाले आणि दोन वर्षे रिहॅबमध्ये होतो. मी ड्रग व्यसनी आहे हे मी स्वीकारू शकत नव्हतो. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)
-
मी जेव्हा रिहॅबमधून परत आलो तेव्हा लोक मला चरसी म्हणायचे. मग वाटले हे चुकीचे आहे, रस्त्यावरचे लोक हे बोलत आहेत, काहीतरी करायला हवे. (Express photo by Swadesh Talwar)
-
मी व्यायाम करू लागलो. यानंतर मला पाहून लोक काय बॉडी आहे म्हणायचे, चरसी नाही, असे संजय दत्त म्हणाला
-
संजय दत्तने त्याच्या कॅन्सरबद्दलही भाष्य केले आहे. त्याने सांगितले की २०२० मध्ये जेव्हा त्याला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा तो तासनतास रडला होता.
-
मुलांचा आणि पत्नीचा विचार करून त्याला अश्रू आवरले नाहीत.(फोटो – Maanayata Dutt/Instagram)
-
राकेश रोशनने संजय दत्तला एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता दिला आणि उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला (फोटो – PTI)
-
संजय दत्तच्या नुकत्याच रिलीज झालेल्या KGF-२ मध्ये तो अधीराच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स