-
एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शत RRR हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरण (Ram Charan) सगळ्या ठिकाणी अनवाणी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसला.
-
राम चरणने भगवान अयप्पा स्वामी यांचे ४५ दिवसांचे कठोर महाव्रत केले. त्याला अयप्पा दीक्षा असेही म्हणतात.
-
आता राम चरणनंतर ज्युनियर एनटीआरनेही (Jr Ntr) हनुमान दीक्षा घेतली आहे. यासोबत त्याने २१ दिवस अनवाणी राहण्याचे व्रत घेतले आहे.
-
सध्या ज्युनियर एनटीआरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोमध्ये ज्युनियर एनटीआर हा भगव्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केल्याचे दिसत आहे. या शिवाय त्याच्या गळ्यात माळ आणि कपाळावर तिलक लावल्याचे दिसत आहे.
-
चित्रपटाला मिळालेलं यश पाहता ज्युनियर एनटीआरने हनुमान दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
-
हनुमान जयंतीला त्याने पूजा केली. २१ दिवस तो दीक्षा काटेकोरपणे पाळणार आहे. या दरम्यान अनवाणी राहण्यासोबतच तो सात्विक भोजन करणार आहे.
-
यापूर्वी राम चरणने अयप्पा दीक्षा घेतली होती. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतही तो अनवाणी आणि काळ्या कपड्यांमध्ये दिसला होता.
-
ही दीक्षा अत्यंत कठोर असल्याचे सांगितले जाते. यामध्ये ४५ दिवस जमिनीवर झोपावे लागते. ब्रह्मचार्य पाळावे लागते.
-
काळे वस्त्र परिधान करून सात्विक भोजन करावे लागते. बातमीनुसार, राम चरण दरवर्षी हे व्रत करतो.
-
RRR च्या दोन्ही कलाकारांचा लूक पाहून चाहते त्यांची स्तुती करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तेलुगू चित्रपट कलाकार नेहमीच भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आदर करतात, बॉलिवूडप्रमाणे नाही.’
-
दुसरा नेटकरी म्हणाला, आपल्या दक्षिण भारतीय कलाकारांचा अभिमान आहे. त्यांना देव का मानतात ते आज समजले. बॉलिवूडला लाज वाटली पाहिजे. (All Photo Credit : Vamsi Kaka Twitter/ Jr NTR Instargam/ Twitter)

IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO