-
स्टार प्रवाहवरील ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ‘देवकी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड लवकरच आई होणार आहे.
-
मिनाक्षी गरोदर असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आई होणार असल्याची माहिती दिली.
-
सध्या मिनाक्षी तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असून या काळातील अनेक फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
-
मिनाक्षीने आतापर्यंत तिच्या बेबीबंपसोबत बऱ्याचदा फोटोशूट केलं आहे.
-
मात्र, पुन्हा एकदा एक नवीन फोटोशूट करुन मिनाक्षी चर्चेत आली आहे.
-
विशेष म्हणजे या फोटोंमधून मिनाक्षीच्या चेहऱ्यावरील आई होणार असल्याचा आनंद पूर्णपणे दिसून येत आहे.
-
मिनाक्षीच्या या फोटोंवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
मिनाक्षी सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे सातत्याने चर्चेत येत आहे.
-
मिनाक्षी पहिल्यांदाच आई होणार असल्यामुळे ती आणि तिचे कुटुंबीय प्रचंड आनंदात आहेत.
-
मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे.
-
कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिनाक्षी राठोड / इन्स्टाग्राम)

डोनाल्ड ट्रम्प ९० दिवसांसाठी आयात शुल्कापासून दिलासा देणार? व्हाइट हाऊसचं स्पष्टीकरण…