-
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा आज २० एप्रिल रोजी लग्नाचा वाढदिवस आहे. २००७ मध्ये अमिताभ यांच्या जलसा या बंगल्यावर मोठ्या थाटामाटात त्या दोघांनी लग्न केले.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांच्या विषयी आणि त्यांच्या लव्हस्टोरी विषयी काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
-
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे ऐश्वर्या राय बॉबी देओलसोबत ‘ओर प्यार हो गया’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि अभिषेक एका चित्रपटाचे लोकेशन पाहण्यासाठी आला होता.
-
हा तो काळ होता जेव्हा अभिषेक अभिनेता नसून प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करत होता.
-
मात्र, बॉबी-अभिषेक लहानपणापासूनचे मित्र होते. एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांनी भेटण्याचे ठरवले. इथेच बॉबीने ऐश्वर्या रायची अभिषेकशी ओळख करून दिली.
-
अभिषेकने २००० मध्ये ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्याच वर्षी त्याने ऐश्वर्या रायसोबत ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात दोघांनाही पसंती मिळाली होती.
-
त्यावेळी ऐश्वर्या दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि अभिषेक तिचा एकमेव मित्र होता.
-
त्यावेळी ऐश्वर्या सलमान खान सोबत रिलेशनशिपमध्ये होती. तर अभिषेक बच्चन करिश्मा कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये होता.
-
काही काळानंतर ऐश्वर्याचा सलमान खानसोबत ब्रेकअप झाला आणि ती विवेक ओबेरॉय सोबत रिलेशनशिपमध्ये आली. पण त्याच्या सोबतही तिचा ब्रेकअप झाला.
-
त्यानंतर २००६ ते २००७ या काळात अभिषेक आणि ऐश्वर्या सतत भेटू लागले.
-
२००६ साली ऐश्वर्या आणि अभिषेकने ‘गुरू’, ‘उमराव जान’ आणि ‘धूम २’ मध्ये एकत्र काम केले.
-
‘गुरु’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, असे म्हटले जाते.
-
‘धूम २’ च्या शूटिंगदरम्यान दोघे जवळ आले आणि दोघांच्या मनात एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या.
-
यानंतर ‘गुरु’ चित्रपटाच्या टोरंटो प्रीमियरमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि ऐश्वर्याने लगेच होकार दिला.
-
अभिषेक आणि ऐश्वर्याने ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘गुरु’ आणि ‘धूम 2’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.(All Photo Credit : File Photo)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?