-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते.
-
प्राजक्ता ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकतेच प्राजक्ताने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोत तिने एक छान रंगेबेरंगी साडी परिधान केली आहे. त्यासोबत तिने छान ज्वेलरीही घातली आहे.
-
प्राजक्ताने शेअर केलेले हे फोटो महाराष्ट्राची हास्यजत्रा या सेटवरचे असल्याचे दिसत आहे. या फोटोंना तिने दिलेले कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
-
“करवटें बदलते रहें सारी रात हम…आप की क़सम… (कोणामुळे ते विचारू नका…सच हम कह ना सकेंगे और झूठ हम आपसे कहना नहीं चाहते….)”, असे ती या फोटोला कॅप्शन देताना म्हणाली.
-
प्राजक्ताचे हे फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत. अनेकजण त्यावर लाइक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”