-
रणवीर सिंग स्टारर ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट १३ मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटात अभिनेत्री शालिनी पांडे रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
-
शालिनी पांडेने अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळून जावे लागल्याचा खुलासा मीडियासमोर केला.
-
शालिनी पांडेचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. यापूर्वी ती Zee5 च्या Bamfaad मध्ये दिसली आहे.
-
शालिनी पांडेला खरी प्रसिद्धी विजय देवराकोंडा यांच्या ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातून मिळाली.
-
शालिनीने सांगितले की, तिच्यासाठी अभिनेत्री बनणे इतके सोपे नव्हते. त्यासाठी तिला घरातून पळून जावे लागले.
-
शालिनी पांडेच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने इंजिनीअरिंग करावी. शालिनीने सांगितले की, तिने तिच्या वडिलांना हे पटवून दिले की तिला जवळपास चार वर्षे अभिनय करायचा आहे. पण वडिलांना ते मान्य नव्हते.
-
शेवटी, शालिनीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते.
-
घरातून पळून गेल्यावर तिला खूप संघर्ष करावा लागला.
-
शालिनीने सांगितले की, आता तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावरील नाराजी दूर केली आहे. (All Photo Credit : File Photo)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…