-
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार अभिनयशैली आणि विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात.
-
नुकतंच लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात हजेरी लावली.
-
‘दिल दिमाग और बत्ती’ हा सोनालीचा नवीन चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाची संपूर्ण टीम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात सहभागी झाली होती.
-
याचे फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
“हास्यजत्रेच्या मॅड मॅड मॅड कलाकारांबरोबर आमच्या ‘दिल दिमाग और बत्ती’च्या टीमला आलेली मज्जा नक्की बघा. नमा, प्रसाद, ओंकार, गौरव, प्रियदर्शनी, हेमंत , शेषपाल, वनिता, पृथ्वीक, श्याम, रसिका, चेतना, निखिल, दत्तू आणि समीर…तुम्ही महान आहात.”, असं कॅप्शन सोनालीने या पोस्टला दिलं आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांचं कौतुक या पोस्टमधून सोनालीने केलं आहे.
-
सोनालीची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका