-
मनोज वाजपेयी भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आज मनोज ५३ चा वाढदिवस साजरा करत आहे.
-
रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्याने आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट, सीरिज हा चर्चेचा विषय ठरतो. पण मनोजचे खासगी आयुष्य फार चर्चेत नव्हते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या खासगी आयुष्य जाणून घेऊया.
-
सुरुवातीच्या काळात मनोजने दिल्लीतील एका मुलीसोबत लग्न केलं होतं. परंतु हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.
-
अवघ्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला होता. मनोज त्याच्या करिअरमध्ये स्ट्रगल करत असल्यामुळे त्याचा घटस्फोट झाल्याचे म्हटले जाते.
-
घटस्फोटानंतर मनोज मुंबईत आला आणि काम शोधू लागला.
-
एका चित्रपटाच्या वेळी त्याची ओळख अभिनेत्री नेहा म्हणजेच शबाना रझाशी झाली.
-
या अभिनेत्रीने १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘करीब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. या चित्रपटात नेहासोबत अभिनेता बॉबी देओल दिसला होता.
-
या दरम्यान, मनोजचा ‘सत्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटाने मनोजला रातोरात स्टार बनवलं. ‘सत्या’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान ते एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते.
-
मनोज आणि नेहाच्या भेटी वाढू लागल्या होत्या. हळूहळू त्यांच्या मैत्रितील रुपांतर प्रेमात झाले.
-
५ वर्षे डेट केल्यानंतर २००६मध्ये नेहा आणि मनोजने लग्न केले. नेहाने ‘होगी प्यार की जीत’, ‘फिजा’, ‘राहुल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
-
तसेच तिने तेलुगू आणि तमिळ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नेहा आणि मनोजला एक मुलगी आहे. तिचे नाव ‘अवा’ आहे.
Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार