-
Happy Birthday Shriya Pilgaonkar: श्रिया पिळगावकर आज मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. थिएटर, मराठी चित्रपट आणि बॉलीवूडमधून ओटीटीपर्यंतचा प्रवास करणारी श्रिया २५ एप्रिल रोजी ३३ वर्षांची झाली आहे. श्रियाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी (सर्व छायाचित्रे: श्रिया पिळगावकर/फेसबुक)
-
श्रिया पिळगावकर ही प्रसिद्ध अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे.
-
श्रिया पिळगावकरने तिच्या आई-वडिलांसोबतची टीव्ही मालिका तूतू मैंमें मधून बाल कलाकार म्हणून पदार्पण केले होते.
-
शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रियाने प्रथम रंगभूमीवर आणि नंतर मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
-
श्रिया ही तिचे वडील सचिन यांची जबरा फॅन आहे.
-
श्रियाने अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्येही काम केले आहे.
-
श्रियाला तिची खरी ओळख मिर्झापूर या वेबसिरीजमधून मिळाली. मिर्झापूरमध्ये ती स्वीटी या म्हणून खूप लोकप्रिय झाली.
-
त्यानंतर एकामागून एक लोकप्रिय वेब सिरीजमध्ये श्रिया पिळगावकरने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली.
-
श्रिया म्हणते की एकाच आयुष्यात कधीकधी RAW एजंट, फॉरेन्सिक तज्ञ, रिपोर्टर आणि वकील बनून आपल्याला अनेक भूमिका जगता येतात, हाच अभिनयाचा सर्वोत्तम भाग आहे.
-
श्रियाला गोड खायला खूप आवडतं. ती मध्यरात्री उठून गोड पदार्थ खात असते.
-
श्रियाचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘झिरो’ होता. या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली होती.
-
श्रिया ही एक प्रोफेशनल जलतरणपटू देखील आहे. तिला डान्स आणि गाण्यातही रस आहे.
-
श्रियाला ५ भाषा येतात. जपानी, फ्रेंच या दोन परदेशी भाषांशिवाय ती इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतही पारंगत आहे.
-
नुकतीच श्रियाची नवीन वेब सिरीज गिल्टी माइंड्स OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर रिलीज झाली आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा