-
Dharmendra Movies On OTT: धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते होते. आताही ते काही चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. अमेझॉन प्राईम (Amazon Prime), नेटफ्लिक्स (Netflix) आणि एमएक्स प्लेयर (MX Player) सारख्या ओटीटी प्लेटफॉर्मवर धर्मेंद्र यांचे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत.
-
त्यापैकी धर्मेंद्र यांच्या ७ चर्चित सुपरहिट चित्रपटांचा आढावा. तुम्ही हे चित्रपट एमएक्स प्लेयरवर कोणतंही सब्सक्रिप्शन न घेता मोफत पाहू शकता.
-
Jab Yaad Kisi Ki Aati Hai: ‘जब याद किसी की आती है’ या चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत माला सिन्हा यांनी काम केलं. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली होती.
-
Dharam Veer: धर्मेंद्र आणि जितेंद्र यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘धरम वीर’ देखील सुपरहिट ठरला होता.
-
Hrishikesh Mukherjee: ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलेला चित्रपट गुड्डीला तर अनेक पुरस्कार मिळाले होते.
-
Mera Gaon Mera Desh: धर्मेंद्र यांचा ‘मेरा गांव मेरा देश’ हा अविस्मरणीय चित्रपट देखील एमएक्स प्लेयरवर मोफत उपलब्ध आहे.
-
Anupama: शर्मिला टॅगोर यांच्यासोबतचा धर्मेंद्र यांचा चित्रपट ‘अनुपमा’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता.
-
Farishtay: ‘फरिश्ते’ चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत विनोद खन्ना आणि श्रीदेवी मुख्य भूमिकेत होते.
-
Apne: ‘अपने’ चित्रपटात धर्मेंद्र पहिल्यांदाच आपल्या दोन्ही मुलांसोबत मोठ्या पडद्यावर दिसले.

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन