-
ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे.
-
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
-
‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहे.
-
‘या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली’, असा खुलासा प्रसाद ओकने एका मुलाखतीत केला आहे.
-
यावेळी प्रसाद ओक म्हणाला की, “मी स्वत: या सर्व प्रतिक्रिया पाहिल्यानंतर नि:शब्द झालो आहे. आनंद दिघेंच्या कुटुंबियांच्या, एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रिया बघून मी स्वत:च भावूक झालो आहे.”
-
“एखाद्या कलाकारासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. मी पूर्वी काहीतरी केलेले पुण्य असेल ज्याचे हे फळ आहे. त्यामुळे मला इतक्या मोठ्या माणसाची भूमिका साकारण्यासाठी मिळतं आहे”, असेही प्रसादने यावेळी म्हटले.
-
“धर्मवीर या संपूर्ण चित्रपटाला दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे, असेही मी मानतो. त्याशिवाय हे शक्य झाले नसते”, असेही प्रसादने सांगितले.
-
“मी जेव्हा ही भूमिका साकारत होतो, तेव्हा तासनतास व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्यांचा फोटो बघत बसायचो. कारण त्या माणसाच्या डोळ्यात एक वेगळीच गंमत होती आणि एक अभिनेता म्हणून त्यांचे डोळे तशाच प्रकारे साकारणं ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी होती”, असे प्रसाद म्हणाला.
-
“मी अनेक तास त्यांच्या फोटोकडे टक लावून बघायचो. कोण जाणे? काय माहिती, पण ते सतत माझ्या आसपास असायचे आणि नकळत ते माझ्यात यायचे”, असेही त्याने म्हटले.
-
“आपण अनेकदा पुस्तकात परग्राह्य प्रवेश असे वाचले आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मी स्वत: ते अनुभवले आहे. हा एक प्रचंड विलक्षण अनुभव होता”, असेही तो म्हणाला.
-
यापुढे प्रसाद म्हणाला की, “मला आधी मी कसा दिसेन हे कळत नव्हते. जेव्हा मी त्या गेटअपमध्ये आरशात पाहिलं तेव्हा मलाही वाटत नव्हते की मी दिघे साहेबांचा रोल करु शकेन किंवा मी त्यांच्यासारखा दिसेन.”
-
“या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय विद्याधर बंडे आमचे मेकअपदादा आहेत त्यांना जाते. त्यानंतर माझ्याकडून प्रवीण तरडे याने जे काही करुन घेतलं त्याचे आहे”, असेही त्याने सांगितले.
-
“हा चित्रपट प्रचंड अवघड होता. प्रवीण हा फार उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो सीन सुरु असताना नवीन डायलॉग लिहितो आणि समोरच्या अभिनेत्याला बोलायला लावतो. त्यावेळी मुळात दिघें साहेबांची भूमिका करायचे दडपण मला होते. त्यात नवीन डायलॉग याचेही मला दडपण आले होते”, असेही तो म्हणाला.
-
“मी प्रचंड दडपणाखाली हा चित्रपट करत होतो. पण मला तेवढीच मज्जाही आली”, असेही त्याने सांगितले.
-
दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे.
-
येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”