-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सौंदर्यासोबतच अभिनयाची छाप पाडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिचा आज वाढदिवस.
-
समांथा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
समांथाने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून २०१० साली टॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
-
त्यानंतर ‘थेरी’, ‘अ आ’, ‘अंजान’, ‘मक्खी’ असे एक सो एक हिट चित्रपट तिने दिले.
-
‘द फॅमिली मॅन २’ वेब सीरिजमधील तिने साकारलेली ‘राजी’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
-
२०१७ साली साऊथ सुपरस्टार नागार्जूनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्यसोबत समांथाने लग्नगाठ बांधली.
-
परंतु नंतर काही कारणांमुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले.
-
नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथा ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती.
-
या गाण्याची क्रेझ अजूनही कायम आहे.
-
समांथाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
सोशल मीडियावरून समांथा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
इन्स्टाग्रामवर समांथाचे २३.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
समांथा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
हैदराबाद मधील ज्युबिली हिल्स येथे समांथाचा आलिशान बंगला आहे.
-
लक्झरियस आयुष्य जगणाऱ्या समांथाकडे महागाड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.
-
समांथाकडे ‘बीएमडब्ल्यू ३ सीरीज’, ‘बीएमडब्ल्यू ७’ याशिवाय ‘ऑडी क्यू ७’ आणि ‘जॅग्वार’ या गाड्या आहेत.
-
एवढंच नाही तर तब्बल २.३ कोटी रुपयांची ‘मर्सिडिज बेन्झ जी६४ एएमजी’ कार असलेली समांथा ही एकमेव अभिनेत्री आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, समांथा एकूण ११ मिलियन डॉलर संपत्तीची मालकिण आहे.
-
भारतीय रुपयानुसार समांथाकडे ८० कोटींची संपत्ती आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील महागड्या अभिनेत्रींपैकी समांथा एक आहे.
-
एका चित्रपटासाठी समांथा तीन करोड रुपये इतके मानधन घेते. (सर्व फोटो : समांथा रुथ प्रभू/ इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई