-
हेमा मालिनी, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अगदी शिल्पा शेट्टी, सोनम कपूर यांसारख्या बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांच्या घरी आजवर चोरी झालेली आहे. (सौजन्य : जनसत्ता)
-
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी चोरी झाली. दिल्ली येथील सोनमच्या घरी २ कोटींपेक्षा अधिक दागिने तसेच पैश्यांची चोरी झाली असल्याचं समोर आलं होतं. (सौजन्य : जनसत्ता)
-
अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी देखील चोरी झाल्याची घटना घडली. दिपक केवट या नावाच्या व्यक्तीने अमिताभ यांच्या घरामधून आठ हजार रूपयांची चोरी केली होती.
-
अमिताभ यांच्या घरी जेव्हा चोरी झाली तेव्हा त्यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी चोरी करणाऱ्या व्यक्तीला पकडलं होतं.
-
२०१०मध्ये अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गोरेगाव येथील राहत्या घरी जवळपास ८४ लाख रूपयांची चोरी झाली होती. ही घटना घडली तेव्हा हेमा नागपूर येथे गेल्या होत्या.
-
अभिनेत्री काजोलच्या घरामधून जवळपास ५ लाख रूपयांच्या दागिन्यांची चोरी झाली. मात्र ही चोरी तिच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीनेच केली असल्याचं नंतर उघड झालं होतं.
-
ऑक्टोबर २०१३मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राच्या जुहू येथील बंगल्यावर चोरी झाली होती. शिल्पाच्या घरामधून महागडं म्युझिक सिस्टम आणि आयपॉड चोरी झालं होतं.
-
अभिनेता सैफ अली खानच्या खार येथील ऑफिसमधून ११ स्प्लिट एसीची चोरी झाली होती.
-
२०१५मध्ये सोनह चौहाणच्या घरी ४० लाख रूपयांची चोरी झाली. दागिने, पैश्यांसह तिच्या मिस वर्ल्ड टुरिझम मुकुटाची देखील चोरी झाली होती. (सौजन्य : सगळे फोटो इन्स्टाग्राम)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक