-
बॉलिवूड कलाकार हे प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन म्हणून घेत असतात. त्यासोबतच त्यांचे अनेक साइड बिझनेस देखील असतात. साइड बिझनेस करणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये सलमान खान, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया सेलिब्रिटी आणि त्यांच्या साइड बिझनेस विषयी…
-
दीपिका पदूकोणचा स्वत:चा कपड्यांचा ब्रँड आहे. ‘द लिव लव्ह लाफ फाऊंडेशन’ हे देखील तिचे आहे.
-
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान.
-
शाहरुखचे ‘रेड चिलीज’ नावाचे एक प्रोडक्शन हाऊस आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर या आयपीएल टीमचा तो को-ओनर आहे.
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा भावासोबत ‘क्लीन स्लेट’ नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवते. त्यासोबतच तिचा एक कपड्यांचा ब्रँड देखील आहे.
-
अभिनेता अक्षय कुमार हा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. तो हरिओम एंटरटेनमेंट प्रोडक्शन आणि ग्राजिंग गॉट पिक्चर्सचा मालक आहे. इतर काही ब्रँडसोबतही त्याचा टायअप आहे.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे सर्वच चित्रपट हिट ठरतात. त्याचा बिंग ह्यूमन बा ब्रँड लोकप्रिय आहे. त्याचे एक प्रोडक्शन हाउस देखील आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आयपीएलची राजस्थान रॉयल्स ही टीम होती. पण नंतर तिने ती विकली. आता शिल्पाचे एक स्पा आणि सलॉन आहे.
-
अभिनेता हृतिक रोशन एक जीमचा मालक आहे. त्यासोबतच त्याचा कपड्यांचा एचआरएक्स ब्रँड देखील लोकप्रिय आहे.
-
अभिनेता अजय देवगणचे अनेक साइड बिझनेस आहेत. त्याचे अजय देवगण फिल्म नावाचे एक प्रोडक्शन हाउस आहे.
-
तसेच किडजानिया नावाच्या फॅमिली एंटरटेनमेंट इंटरनॅशनलमध्ये देखील अजय पार्टनर असल्याचे म्हटले जाते. तसेच गुजरातमध्ये त्याचे सोलार प्रोजक्ट असल्याचे म्हटले जात आहे.
-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. तिचे पर्पल पेबल्स पिक्चर्स नावाचे प्रोडक्शन हाउस आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये तिने सोना नावाचे एक रेस्टॉरंट सुरु केले आहे. (All Photo Credit : File Photo)
Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना