-
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
-
अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती.
-
मिनाक्षी ही प्रेग्नेंट असतानाही या मालिकेत काम करत होती. मात्र आता तिने या मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
-
त्यानंतर आता तिची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न निर्माण झाला होता.
-
पण आता या मालिकेतील देवकीची भूमिका अभिनेत्री भक्ती रत्नपारखी साकारणार आहे.
-
भक्तीने झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत मॅडीची भूमिका साकारली होती. याच भूमिकेमुळे ती खरी प्रसिद्धीझोतात आली.
-
भक्तीने साकारलेले हे पात्र थोडे विनोदी स्वभावाचे आणि भोळसट होते.
-
उत्कृष्ट अभिनयामुळे तिचे हे पात्र घराघरात प्रसिद्ध झाले होते.
-
या मालिकेशिवाय भक्ती रत्नपारखीनं उंबरठा, देऊळ, ओह माय गॉड अशा हिंदी अशा चित्रपटात काम केले आहे.
-
विनोदी अभिनेते निखिल रत्नपारखी यांच्यासोबत ती विवाहबद्ध झाली आहे.
-
दरम्यान या मालिकेतील देवकी ही भूमिका नकारात्मक नसली तरी सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चेत आहे.
-
ही मालिका सोडल्यानंतर याचा मालिकेवर काय परिणाम होणार का? भक्ती रत्नपारखी या भूमिकेस कसा न्याय देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
१५ मार्च पंचांग: बुधाचे राशी परिवर्तन १२ राशींसाठी शुभ ठरेल की अशुभ? तुमच्या आयुष्यात काय बदलणार? वाचा राशिभविष्य