-
प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने नवीन विक्रम रचले आहेत.
-
‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतातील चौथा चित्रपट ठरला आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव सामिल झाले आहे.
-
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात कमाईच्या बाबतीत नवा विक्रम रचला आहे.
-
हिंदी भाषेमध्ये डब झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
-
. यश आणि संजय दत्तचा हा चित्रपट लॉकडाऊननंतर सर्वाधिक कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट आहे.
-
तसेच ओडिसामध्ये १० कोटी तर केरळमध्ये ५० कोटी रुपये कमावून या चित्रपटाने प्रादेशिक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
-
अॅडव्हान्स बुकिंगमध्येही ‘केजीएफ चॅप्टर २’ सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
-
या दाक्षिणात्य चित्रपटामधील कलाकार देखील चित्रपटाला मिळालेलं यश सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो – सगळे फोटो फाईल)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?