-
आजकाल YouTubers वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. ते युट्यूबर्स यातून
खूप चांगले नाव आणि पैसे कमावत आहेत. परंतु हे सर्व त्यांच्या सब्सक्राइबर आणि व्यूज पर अवलंबून असते. आशिष चंचलानी, भुवन बाम, अमित भदाना हे काही नाव खूप प्रसिद्ध YouTubers ची आहेत. त्यांचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत. परंतु लाखोंमध्ये कमाई असलेल्या या YouTubers चे शिक्षण किती आहेत माहित आहे का? चला जाणून घेऊया. -
अमित भदानाचा व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिला असेल. अमितने दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांचे २४ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. (फोटो क्रेडिट: अमित भदाना इन्स्टाग्राम)
-
उज्ज्वल चौरसियाच्या यूट्यूब चॅनेलचे नाव टेक्नो गेमर्स आहे, ज्याचे २६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. त्याचे शिक्षणही बारावीपर्यंत झाले आहे. (फोटो क्रेडिट: उज्ज्वल चौरसिया इन्स्टाग्राम)
-
यूट्यूबवर बीबी की वाइन्स चॅनल चालवणाऱ्या भुवन बामने दिल्लीतूनच इतिहासात पदवी घेतली आहे. त्याचे यूट्यूबवर २५.४ मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. (फोटो क्रेडिट: भुवन बाम इन्स्टाग्राम)
-
युट्यूबर प्राजक्ता कोळीच्या चॅनलचं नावं mostlysane असे आहे. प्राजक्ताने मुंबईतील केळकर कॉलेजमधून मास मिडीयाची पदवी घेतली आहे. प्राजक्ताचे ६.६४ मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. (फोटो क्रेडिट : प्राजक्ता कोळी इन्स्टाग्राम)
-
राउंड टू हेल चॅनल तीन मित्र चालवतात. यूट्यूबवर त्याचे २५. ८ मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. (फोटो: राउंड २ हेल इन्स्टाग्राम)
-
आशिष चंचलानी देखील एक प्रसिद्ध YouTuber आहे आणि त्याने इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्याचे यूट्यूबवर २८.१ मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. (फोटो क्रेडिट: आशिष चंचलानी इन्स्टाग्राम)
-
Total Gaming Channel चे YouTube वर ३२.२ मिलियन सब्रस्कार्यबर्स आहेत. टोटल गेमिंग चॅनेल चालवणाऱ्या अज्जू भाईने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.(फोटो क्रेडिट : टोटल गेमिंग इन्स्टाग्राम)
-
तरुण पिढीला CarryMinati हे चांगलं माहीत आहे. जरी कॅरीने फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले असले तरी त्याचे YouTube वर ३५.५ मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. (फोटो क्रेडिट: कॅरीमिनाटी इन्स्टाग्राम)

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…