-
अभिनेत्री पुनम पांडेने (Poonam Pandey) टीव्ही रियलिटी शो लॉक अपमधून (Lock Upp) बाहेर येताच पती सॅम बॉम्बेवर (Sam Bombay) गंभीर आरोप केले.
-
याआधी पुनमने सॅम बॉम्बेवर मारहाण केल्याचा आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज झाल्याचा आरोप केला होता.
-
मात्र, आता शोमधून बाहेर आल्यावर पुनमने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत नव्याने गंभीर आरोप केलेत. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
-
पुनम म्हणाली की सॅम बॉम्बेने खूप त्रास दिला. तो मला मारहाण करायचा. त्यामुळे मला ब्रेन हॅमरेज झालं आणि माझी वास घेण्याची क्षमता गेली.
-
ब्रेन हॅमरेजमुळे आता मला कोणत्याही गोष्टीचा वास घेता येत नाही, असंही पुनमने या मुलाखतीत सांगितलं.
-
पुनम म्हणाली, “आता मला कोणत्याही वस्तूचा किंवा अन्न पदार्थाचा वास घ्यायचा असेल तर सोबत असलेल्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते.”
-
लग्नानंतर सहन केलेल्या कौटुंबिक हिंसाचारानंतर मी मानसिक आणि शारीरिक पातळीवर अधिक कणखर झाल्याचंही पुनमने सांगितलं.
-
पुनम म्हणाली, “लॉक अप शोमध्ये सहभागी झाल्यानंतर माझे उपचार थांबले होते. मात्र, आता मी पुन्हा उपचार सुरू करू शकेल.”
-
पुनम आणि सॅमने २०२० मध्ये लग्न केलं होतं. मात्र, काही दिवसांनीच पुनमने सॅमवर मारहाणीचे आरोप केले. यानंतर या आरोपांमुळे सॅम बॉम्बेला दोनवेळा तुरुंगाची हवाही खावी लागली होती. ( सर्व फोटो सौजन्य : पुनम पांडे इस्टाग्राम @poonampandeyreal)

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…