-
ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे.
-
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
नुकतंच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
-
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच सर्व शिवसैनिकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.
-
“मी आनंद दिघे साहेबांसोबत एका दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी मी पाहिले होते ते काम करताना तहानभूक विसरुन काम करत असतं. प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्यासारखे काम करावे. ते प्रत्येकाला प्रेमाने व आपुलकीने जवळ करायचे, असा नेता पुन्हा होणे नाही.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“ज्या वेळी ते गेले त्यावेळी त्यांचे वयं पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले. चोवीस तास ते कामाला वाहिलेले होते. त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी ‘धर्मवीर’ जरूर पाहावा”, असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
-
“काही काही क्षण असे असतात की शब्द सुचत नाहीत, आपण त्या काळात निघून जातो. आता तसं झालेलं आहे. एकनाथ तुम्ही आपल्या ठाण्याच्या रिवाजाप्रमाणे शाल आणि गुच्छ रितीरिवाज म्हणून दिला आणि नकळत माझ्या तोंडून शब्द उमटले, शाब्बास नाव राखलंत, निष्ठा राखलीत”, असेही त्यांनी म्हटले.
-
“ही चित्रपटाची झलक आहे आणि ती झलक बघत असताना, शिवसेना म्हणजे काय? शिवसैनिक म्हणजे काय आहे? नुसता कार्यकर्ता नाही तर गुरु आणि शिष्य असं एक नातं जपणारा, जगातला हा एकमेव पक्ष असेल आणि या भावना असल्यामुळेच अनेकांनी आतापर्यंत शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांनी ज्यांनी हे प्रयत्न केले, त्यांना संपवून शिवसेना त्यांच्यापुढे गेली”, असेही ते म्हणाले.
-
“आनंद दिघे म्हटलं की मला ते दिवस आठवतात. त्यात बाळासाहेबांसोबतचा गुरुपौर्णिमादरम्यानचा एक क्षण दाखवण्यात आला आहे. ठाणेकरांनी तीही परंपरा राखलेली आहे. जर त्यांना सकाळी ११ ची वेळ दिली, तर ते जेव्हा किती वाजता येतील तेव्हा त्यांचे ११ वाजलेले असतात आणि हे त्यावेळला सुद्धा व्हायचं, असे ते म्हणाले.
-
“बाळासाहेब हे वेळेचे भोक्ते, वेळ म्हणजे वेळ. घड्याळ्याच्या काट्यावरती गोष्टी झाल्याच पाहजेत आणि मग आनंद दिघेंना जर सकाळी ११ ची वेळ दिलेली असेल तर दोन वाजेपर्यंत त्यांचा पत्ता नसायचा. मग ते दोन वाजता यायचे तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे”, असा किस्साही उद्धव ठाकरेंनी सांगितला.
-
“पण गंमत म्हणून सांगतो हा सगळा राग फक्त काही काळापूर्ती असायचा, दिघे साहेब समोर येऊन उभे राहायचे, एका शब्दानेही बोलायचे नाहीत. पण ते समोर आल्यानंतर तो राग सगळा वाहून जायचा आणि मग त्यांच्यातील प्रेम पाहायला मिळायचं”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“दिघे साहेबांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय ५० होते. पण दिवसरात्रीचा हिशोब केला तर ते १०० वर्ष जगले आणि नुसतेच जगले नाही तर त्यांनी अनेकांना जगवलं, जोपासलं”, असेही ते म्हणाले.
-
“हिंदूहृदयसम्राट, धर्मवीर या ज्या काही पदव्या, उपाध्या असतात, त्या कुठल्या कॉलेजमधून किंवा मागून मिळत नाहीत, त्या जनतेनी द्याव्या लागतात. ते जनता ठरवत असते, जनता देत असते”, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
-
“दिघे साहेब म्हटल्यानंतर केवळ ठाणेकरच नाही तर शिवसैनिकांचे डोळेसुद्धा आठवणीने पाणवतात. सगळेच भारावतात आणि असा माणूस पुन्हा पुन्हा होणे नाही. मी ठाणेकर आणि शिवसैनिकांना एकच सांगेन की हा चित्रपट केवळ चित्रपट म्हणून न पाहता निष्ठा म्हणजे काय असतं, यासाठी पाहावा”, असेही ते म्हणाले.
-
“यातून तुम्हाला त्याचे दर्शन नक्कीच घडेल. अशी माणसे आपल्यात कायमची राहावी असं जरी वाटत असलं तरी शेवटी आय़ुष्य असतं. ती नसली तरी कोणत्या ना कोणत्या विचाराने, कृतीने, प्रेरणेनं, रुपाने, स्फूर्तीने आपल्यात राहतात आणि ती तशीच राहतील. त्यांचे श्रद्धास्थान अबाधित राहील”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
-
येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (फोटो क्रेडीट – धर्मवीर/इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”