-
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.
-
गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे.
-
नुकतंच महेश बाबूने यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. “हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही. त्यामुळे हिंदी चित्रपट करुन मला माझा वेळ फुकट घालवायचा नाही”, असे महेश बाबू म्हणाला.
-
“मला बॉलिवूडमधून फार जास्त ऑफर मिळालेल्या नाहीत. पण मला वाटत नाही की त्यांना मी परवडेन आणि मला अशा सिनेसृष्टीत काम करायचे नाही ज्यांना मी परवडत नाही”, असे वक्तव्य महेश बाबून केले.
-
“मला हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही. कारण आता तेलुगू चित्रपट देशभरात पाहायला मिळतात. त्यामुळे मला कोणत्याही खास हिंदी चित्रपटात काम करण्याची गरज नाही”, असेही तो म्हणाला.
-
दरम्यान त्याच्या या वक्तव्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे. महेश बाबूची एका चित्रपटासाठी नक्की किती मानधन आकरतो? त्याची संपत्ती किती आहे? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
-
महेश बाबू यांचा जन्म ९ ऑगस्ट १९७५ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथील तेलुगू कुटुंबात झाला.
-
त्यांचे वडील कृष्णा हे प्रसिद्ध अभिनेते होते. महेश बाबूचे वडील शूटींगमध्ये व्यस्त असल्याने त्याने त्याचे बालपण आजोबांसोबत घालवले.
-
बी.कॉम केल्यानंतर महेश बाबूने ३ ते ४ महिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यावेळी त्याला तेलुगू लिहिता वाचता येत नव्हते.
-
महेश बाबू याने वयाच्या चौथ्या वर्षाच्या अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. त्याने बालकलाकार म्हणून ८ चित्रपटात काम केले.
-
यानंतर १९९९ मध्ये ‘राजकुमारु डू’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले.
-
आतापर्यंत त्याने बहुतांश चित्रपटात काम केले आहे. त्याचे प्रत्येक चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.
-
महेश बाबूला ‘प्रिन्स ऑफ टॉलीवूड’ असे म्हटले जाते.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अशी त्याची ओळख आहे.
-
बॉलिवूडला मी परवडणार नाही, असे धक्कादायक वक्तव्य करणारा महेश बाबू हा एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेतो.
-
मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाबू एका चित्रपटासाठी जवळपास ५५ कोटी रुपये मानधन आकारायचा.
-
मात्र आता त्याच्या वाढत्या क्रेझमुळे त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे.
-
सध्या तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रुपये मानधन आकारतो.
-
महेश बाबू हा एखाद्या राजाप्रमाणे आयुष्य जगतो. त्याची एकूण संपत्ती १४९ कोटींहून अधिक आहे.
-
महेश बाबूचे मासिक उत्पन्न २ कोटी रुपये आहे. त्याची सर्वाधिक कमाई चित्रपटांमधून होते.
-
याशिवाय तो अनेक जाहिरातीतही काम करताना दिसतो. यासाठी तो कोट्यावधी रुपये आकारतो.
-
विशेष म्हणजे आपल्या कमाईतील ३० टक्के रक्कम तो दान करतो.
-
महेश बाबूकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
-
२.४० कोटींची रेंज रोव्हर वोग, १.३५ कोटींची BMW, १.४७ कोटी रुपयांची टोयोटा लँड क्रूझर आणि ९० लाखांची SUV या गाड्या त्याच्याकडे आहेत.
![pimpri chinchwad youth cried after demolishing his house infront of his eyes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-08T220913.048.jpg?w=300&h=200&crop=1)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे