-
सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टी असा वाद सुरू असतानाच दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबूनं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य केलंयं.
-
“मी बॉलिवूडला परवडणार नाही” या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेला महेशबाबू महाराष्ट्राचा जावई आहे. त्याची बायको नम्रता शिरोडकर ही मराठी कुटुंबातील आहे.
-
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा हा अभिनेता एका मराठी मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्नाची गाठही बांधली.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा महेश बाबू पहिल्याच भेटीमध्ये नम्रताच्या प्रेमात पडल्याचं त्याने एका कार्यक्रमात सांगितलं होतं.
-
नम्रता महेश बाबूपेक्षा तीन वर्षांनी मोठी असून तिच्या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटापासून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.
-
१९९३ च्या ‘मिस इंडिया फेमिना’चा किताब जिंकल्यानंतर नम्रताने ‘जब प्यार किसी से होता है’ हा बॉलिवूड चित्रपट केला.
-
या चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर नम्रताने दाक्षिणात्य चित्रपट ‘वामसी’ साईन केला होता. या चित्रपटामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत होता.
-
विशेष म्हणजे चित्रपटाच्या सेटवर पहिल्याच दिवशी तो नम्रताच्या प्रेमात पडला.
-
चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असतानाच त्याने नम्रतासमोर त्याच्या प्रेमाची कबुली दिली.
-
त्यानंतर चित्रपटाचं चित्रीकरण पुढे पुढे सरकत असताना त्यांचं प्रेम बहरु लागलं होतं, असं महेश बाबूने सांगितलं.
-
महेश बाबू नम्रताला डेट करत असल्याची गोष्ट फक्त महेशच्या बहिणीला माहित होती. तिच्या व्यतिरिक्त घरातील अन्य कोणत्याही सदस्याला या नात्याविषयी माहित नव्हतं.
-
विशेष म्हणजे ही गोष्ट प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू नये यासाठीच त्याने घरातल्यांनादेखील सांगितलं नव्हतं. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं.
-
लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला आणि ती संसारात रमली .
-
महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला.
-
महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत. (फोटो- महेश बाबू, नम्रता शिरोडकर सोशल मीडिया )

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’