-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं.
-
अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकरने मालिकेत साकारलेली ‘अरुंधती’ची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.
-
सगळ्यांसाठी सतत झटणाऱ्या, स्वतःसाठी न जगता केवळ घरच्यांच्या सुखात समाधान शोधणाऱ्या मधुराणीने साकारलेल्या आईने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
-
अभिनेत्री मधुराणी गोखलेने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. पण ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे मधुराणी घराघरात पोहोचली.
-
साधीभोळी वाटणारी गृहिणी वेळप्रसंगी स्वाभिमान जपण्यासाठी रणरागिणी देखील होते, हे मालिकेतील अरुंधतीने दाखवून दिलं.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली.
-
मधुराणीचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावरून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
मधुराणी तिच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीच्या आईची भूमिका अभिनेत्री मेधा जांभोटकर साकारत आहेत.
-
अरुंधतीच्या आईला मालिकेतून प्रेक्षक पाहत असतात.
-
पण मधुराणीच्या खऱ्या आयुष्यातील आईला तुम्ही पाहिलं आहे का?
-
नुकतंच मधुराणी गोखलेने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने तिच्या आईसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता.
-
‘माझी चिरंतन प्रेरणा…!!’ असं कॅप्शन मधुराणीने या फोटोला दिलं आहे.
-
मायलेकींचा खास फोटो.
-
(सर्व फोटो : मधुराणी गोखले-प्रभुलकर/ इन्स्टाग्राम)

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO