-
बॉलिवूड कलाकार त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसतात. अनेक सेलिब्रिटी फिटनेस कायम ठेवण्यासाठी योगाचा आधार घेताना दिसतात.
-
काही सेलिब्रिटी त्यांचे योगा पोझमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणही यात मागे नाही. दीपिका तिच्या आरोग्य आणि फिटनेस याकडे विशेष लक्ष देताना दिसते.
-
नुकतंच दीपिकाने योगा पोझमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
बॉलिवूडच्या ‘मस्तानी’चे योगा पोझमधील फोटो पाहून चाहते अवाक झाले आहेत.
-
दीपिका पदुकोण उष्ट्रासन पोझमध्ये.
-
फोटोमधील दीपिकाच्या फिटनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
दीपिकाचे योगा पोझमधील फोटो पाहून ती फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतं.
-
(सर्व फोटो : दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)
पुणे पोलिसांकडून अचानक नाकाबंदी; तीन हजार वाहनचालकांची तपासणी; ७२ वाहने जप्त