-
‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आज(१३ मे) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
-
ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
-
‘धर्मवीर’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
-
‘धर्मवीर’ चित्रपटाबद्दल समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.
-
राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्शवत ठरावी अशी जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे.
-
आनंद दिघे यांची बाळासाहेबांप्रति जी श्रद्धा होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघे यांच्याबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे.
-
त्यांच्या या गुरू शिष्य नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे.
-
‘धर्मवीर’ चित्रपटाचा खास शो आज सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला.
-
उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
-
यावेळी आनंद दिघे यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आला.
-
याप्रसंगी आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे शहर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे देखील उपस्थित होत्या.
-
‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक, चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
‘धर्मवीर’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केलं आहे.
-
तर चित्रपटात बाळासाहेबांच्या भूमिकेत अभिनेता मकरंद पाथ्ये दिसणार आहे.

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का