-
बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.
-
काल (१३ मे) रोजी ठाण्यात या चित्रपटाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला.
-
ठाण्यातील व्हीव्हियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात ग्रँड प्रिमियर सोहळा संपन्न झाला.
-
या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास लोकग्रहास्तव चित्रपटामध्ये गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक याच्यासोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेतली.
-
या सोहळ्यासाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाण्यातील सर्व प्रमुख पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी, धर्मवीर चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई, अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता क्षितिश दाते, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-
लेखक प्रवीण तरडे यांच्या लिखाणाने सजलेला ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रेक्षकांना एका जुन्या आणि लोकप्रिय राजकीय नेत्याची कारकिर्द सांगणार आहे.
-
ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्याचा दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे.
-
या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे.
-
ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात शिवसेना अगदी मुख्य शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी केले.
-
शाखा संस्कृती ठाण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा होता.
-
आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. या आश्रमात दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरायचा.
-
आनंद दिघे यांना देवा-धर्माच्या कार्याची विशेष आवड होती. त्यांनीच टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव सुरु केला. सर्वात पाहिला मोठा दहिहंडी उत्सवही दिघेंनीच टेंभी नाक्यावर सुरु केला.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं असून निर्माते मंगेश देसाई आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : फेसबुक)
VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली