-
कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अभिनयासोबतच विदुलाला भटकंतीची फार आवड आहे.
-
विदुला सध्या ऑस्ट्रेलियात मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटतेय.
-
विशेष म्हणजे यावेळीदेखील विदुला चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पूरेपुर प्रयत्न करत आहे.
-
ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो विदुला सोशल मिडियावर शेअर करत आहे.
-
ऑस्ट्रेलिया या देशातल्या वातावरणात आणि भौगोलिकतेमध्ये भारतासारखीच विविधता आहे.
-
निसर्गाची उधळण अगदी मनसोक्त अशीच आहे. येथे हिमप्रदेश आहे, वाळवंट आहे, समुद्रकिनारे आहेत आणि रेन फॉरेस्टदेखील आहे.
-
ऑस्ट्रेलियात बहुतांश पर्यटनाचा ओघ हा सिडनी, मेलबर्न या भोवतीच आहे.
-
ऑस्ट्रेलियातील डोंगररांगा या ऑस्ट्रेलियन आल्प्स म्हणून ओळखल्या जातात.
-
ऑस्ट्रेलिया बेट असल्यामुळे तेथे समुद्री जैववैविध्य आहे.
-
विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विदुला चौगुले / इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल