-
‘बिग बॉस’ मराठी ३ फेम अभिनेता अक्षय वाघमारे सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
-
अक्षयने ८ मे २०२० रोजी ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांच्या मुलीसोबत लग्नगाठ बांधली.
-
मुंबईतल्या दगडी चाळीत हा विवाहसोहळा पार पडला होता.
-
७ मे २०२१ रोजी अक्षय व योगिता यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले.
-
अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव ‘अर्णा’ असं ठेवले आहे.
-
नुकताच अक्षय-योगिताच्या मुलीचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
-
अर्णाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो योगिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अक्षय व योगिताने मुलीच्या वाढदिवसानिमीत्त एक छोटेखानी बर्थडे पार्टी आयोजित केली होती.
-
अर्णाच्या वाढदिवसाचा केकसुद्धा खूपच खास होता.
-
या पार्टीत मोठ्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती.
-
या फोटोंमध्ये अक्षय, योगिता आणि अर्णाने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
-
अर्णाला चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अक्षय बऱ्याचवेळा त्याच्या मुलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.
-
हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षय वाघमारे, योगिता गवळी / इन्स्टाग्राम)
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ