-
फ्रान्समधील फ्रेंच रिव्हिएरा येथे कान्स चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे.
-
चित्रपट आणि फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या कान्स २०२२ महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ (country of honour) चा सन्मान मिळाला आहे.
-
यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
-
कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी भारताची ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
-
कोणत्याही देशाला ‘कंट्री ऑफ ऑनर’ हा बहुमान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण कान्स चित्रपट महोत्सवातील पहिला ‘कंट्री ऑफ ऑनर’, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
या निमित्ताने कान्समध्ये भारतातील अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत.
-
अनुराग ठाकूर यांच्यासह भारतीय शिष्टमंडळात संगीतकार ए. आर रहमान, ग्रॅमी विजेते रिकी केज, गीतकार प्रसून जोशी, दिग्दर्शक शेखर कपूर, गायक मामे खान आणि अभिनेते आर. माधवन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा समावेश होता.
-
कान्स चित्रपट महोत्सवादरम्यान भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या वतीने कान्समध्ये आलेल्या भारतीय शिष्टमंडळासाठी अधिकृत डिनरचे आयोजन करण्यात आले होते.
-
यात खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये देशाच्या विविध भागांतील पदार्थांचा समावेश होता.
-
कान्स रेड कार्पेटच्या पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्र्यांसह भारतातील १० चित्रपट व्यक्तिमत्त्वांनी सहभाग घेतला होता.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स