-
सध्या सगळीकडे कान्स चित्रपट महोत्सवाची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
भारताला या चित्रपट महोत्सवामध्ये पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. ( फोटो : अनुराग ठाकूर/ ट्विटर)
-
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या ७५व्या कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे.
-
या चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून काम पाहत आहे.
-
कान्स चित्रपट महोत्सवातील दीपिकाच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दीपिका हिरव्या रंगाची पॅण्ट आणि प्रिंटेड शर्टमध्ये दिसून आली.
-
यावर तिने खड्यांचा नेकलेस परिधान केला होता.
-
दीपिकाचा हा हटके लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
कान्स चित्रपट महोत्सवात आज दीपिका साडीत दिसून आली.
-
दीपिकाने परिधान केलेली साडी खास सब्यसाची ब्रॅण्डने डिजाइन केली आहे.
-
काळ्या रंगाची शिमरी साडी परिधान करत दीपिकाने रेट्रो लूक केला होता.
-
बन हेअरस्टाइल आणि डोळ्यांच्या मेकअपने दीपिकाने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं.
-
बॉलिवूडच्या मस्तानीच्या रेड कार्पेचवरील या रेट्रो लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
-
दीपिकाचा हा रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून या लूकचं सर्वत्र कौतुक होताना दिसतेय.
-
(सर्व फोटो : दीपिका पदुकोण, फेस्टिवल दे कान्स/ इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”