-
कलाविश्व आणि ग्लॅमर जगताची सुरेख सांगड घालणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे.
-
या चित्रपट महोत्सवाला बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीकडे अनेकांचे लक्ष असते.
-
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आहे. (AP Photo)
-
या महोत्सवातील काही फोटो उर्वशीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पांढऱ्या रंगाच्या सुरेख गाऊनमध्ये उर्वशी रेड कार्पेटवर अवतरली.
-
या ड्रेससोबत उर्वशीने सुंदर असे दागिने परिधान केले आहेत.
-
उर्वशी अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते.
-
उर्वशीच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
कलाविश्वात या चित्रपट महोत्सवावर अनेकांच्याच नजरा खिळलेल्या असतात. (AP Photo)
-
मुख्य सोहळ्यापेक्षा कला आणि फॅशन जगताच्या नजरा कान्सच्या रेड कार्पेटवरच खिळलेल्या असतात.
-
७५वा कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे. (AP Photo)
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्वशी रौतेला / इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स