-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे.
-
अभिनेत्री हृता दुर्गुळेने प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे.
-
१८ मे रोजी मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला.
-
गेल्या कित्येक दिवसांपासून या हृता-प्रतीकच्या लग्नाची चर्चा होती.
-
या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
हृताच्या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
डिसेंबर महिन्यात हृता आणि प्रतीकचा साखरपुडा पार पडला होता.
-
प्रतीक हा लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.
-
मुग्धा यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
प्रतीक शाह हे नाव छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे.
-
प्रतीकने ‘बेहद २’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
-
हृताला अभिनय क्षेत्रात ९ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
आजपर्यंत हृताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
सध्या हृता झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – हृता दुर्गुळे / इन्स्टाग्राम)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का