-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’
-
जवळपास प्रत्येक घरात ही मालिका आवडीने पाहिली जाते.
-
मालिकेतील दयाबेन, टपू सेना, तारक मेहता, पोपटलाल, जेठालाल प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
२००८ सालापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे .
-
अभिनेता शैलेश लोढा यांनी मालिकेतील ‘तारक मेहता’ हे पात्र घराघरात पोहोचवले.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे शैलेश लोढा यांना लोकप्रियता मिळाली.
-
परंतु दयाबेन, टपू यांच्यानंतर आता शैलेश लोढादेखील यांनी देखील मालिका सोडली आहे.
-
शैलेश लोढा यांना दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे त्यांनी हा शो सोडला असल्याचं वृत्त आहे.
-
तसेच मालिकेच्या करारामुळे ते नाराज असल्याचे देखील बोलले जात होते.
-
शिवाय, मालिकेमुळे त्यांना अनेक प्रकल्पही सोडावे लागले आहेत.
-
मात्र आता दुसरी संधी गमवायची नसल्यामुळे त्यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे.
-
शैलेश लोढा यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
शैलेश एक अभिनेता असून उत्तम कवी आणि लेखक देखील आहेत.
-
त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत.
-
अनेकदा शैलेश कवी संमेलनात देखील दिसून आले आहेत.
-
इथूनच त्यांच्या कलाविश्वातील करिअरला सुरुवात झाली.
-
मुळचे राजस्थानचे असलेले शैलेश लोढा यांनी सायन्स विषयात पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
२००७ मध्ये त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’ शोमध्ये सहभाग घेतला होता.
-
नंतर २००८ मध्ये त्यांना ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका मिळाली.
-
जवळपास १४ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर त्यांनी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
-
मीडिया रिपोर्टनुसार, तारक मेहता साकारण्यासाठी शैलेश लोढा यांना एका एपिसोडसाठी १ लाख रुपये मानधन मिळायचे. (सर्व फोटो : शैलेश लोढा/ इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार