-
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावतात.
-
दीपिका पदुकोणपासून ते अगदी नवाजुद्दीन सिद्दीकीपर्यंतची मंडळी रेड कार्पेटवर अवतरली. आता ऐश्वर्या राय बच्चनचा रेड कार्पेटवरील लूक समोर आला आहे.
-
कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने एण्ट्री करताच तिच्यावरच साऱ्यांच्या नजरा खिळल्या.
-
ऐश्वर्याने काळ्या रंगाचा फ्लोरल आणि रफल गाऊन परिधान केला आहे.
-
ऐश्वर्याने या गाऊनवर फक्त चंदेरी रंगाचे आकर्षक कानातले घालणं पसंत केलं.
-
कान्सच्या रेड कार्पेटवर देखील असंच काहीसं घडलं. यावेळी ऐश्वर्याच्या रेड कार्पेट लूकसमोर इतर अभिनेत्रीही फिक्या वाटत होत्या.
-
याआधी कान्समधील गुलाबी रंगाच्या सुटमधील ऐश्वर्याचे फोटो व्हायरल झाले होते.
-
ऐश्वर्याने २००२मध्ये पहिल्यांदाच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.
-
यंदाच्या तिच्या रेड कार्पेट लूकने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका