-
बॉबी देओलची ‘आश्रम ३’ वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या वेबसीरिजमध्ये बॉबीने साकारलेली बाबा निरालाची भूमिका तर प्रचंड गाजली.
-
आता त्याच्या याच भूमिकेवरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
-
हे मीम्स पाहून बहुदा बॉबीला देखील हसू आवरणार नाही.
-
‘आश्रम’ वेबसीरिजचा चाहतावर्गही मोठा आहे.
-
या वेबसीरिजचे दोन भाग सुपरहिट ठरल्यानंतर तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते.
-
राजकारण, ड्रग्स प्रकरण या सगळ्या विषयांमध्ये गुंतलेली ही वेबसीरिज उत्सुकता वाढवणारी आहे.
-
प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजने बॉबीच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
-
बॉबी बऱ्याच काळापासून चंदेरी दुनियेपासून दूर होता. त्याच्याकडे फारसे चित्रपट किंवा इतर कोणतेच प्रोजेक्ट नव्हते.
-
पण ‘आश्रम’ मधून कलाकार म्हणून आपण उत्तम आहोतच हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं.
-
त्रिधा चौधरी, अदिती सुधीर पोहनकर आणि तुषार पांडे यांनी ‘आश्रम’ सीरिजमध्ये काम केलं आहे.
-
आता या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये काय दाखवलं जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
-
काशीपूर येथील एका काल्पनिक कथेवर या सीरिजचं कथानक आधारित आहे.
-
या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताचा ग्लॅमरस अंदाजही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
एम एक्स प्लेअरची ही सीरिज पुढील महिन्यात प्रदर्शित होईल. (फोटो – सगळे फाईल फोटो)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित