-
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे.
-
अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आता नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
रविवारी, २२ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून हा कार्यक्रम सलग २२ तास सोनी मराठी वाहिनीवर सुरू असणार आहे.
-
या कार्यक्रमाचे ५०० पेक्षा जास्त भाग पूर्ण झाले आहेत.
-
सध्या हा कार्यक्रम हास्यपंचमी करतो आहे.
-
महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोम. ते शुक्र. रात्री ९ वाजता पाच दिवस पाहण्यास मिळतो आहे.
-
येत्या रविवारी सलग २२ तास हा कार्यक्रम सोनी मराठीवर पाहता येणार आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं आहे.
-
हास्यवीरांनी आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी प्रेक्षकांना नवी उमेद दिली आहे.
-
लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचं मनोरंजन करत होता.
-
टेन्शनवरची उत्तम मात्रा असणाऱ्या या कार्यक्रमात हास्याचे अनेक फवारे उडणार आहेत.
-
सध्या प्रत्येक भागात मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवताहेत.
-
मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सलग २२ तास प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
-
हा रविवार सगळ्यांसाठीच खास आणि मनोरंजनात्मक ठरणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : यूट्यूब)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल