-
लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे.
-
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे.
-
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते.
-
हंबीरराव यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली.
-
हंबीरराव मोहिते यांच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात दिसणार आहे.
-
या भव्य ऐतिहासिक चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे.
-
अभिनेत्री श्रुती मराठे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात श्रुती ‘महाराणी सोयराबाई’ यांची भूमिका साकारणार आहे.
-
श्रुतीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
‘महाराणी सोयराबाई’ यांच्या भूमिकेत श्रुतीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठीमधील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे.
-
हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
मराठी मनोरंजन विश्वात काम करण्याबरोबच श्रुतीने दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य