-
दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्य या दोन गोष्टींमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे.
-
आईच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या ही कान्स फिल्म फेस्टिवलमधून परतल्याचे पाहायला मिळत आहे.
-
नुकतंच ऐश्वर्याने तिच्या आईचा एक गोड फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू आहेस…म्हणूनच मी आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी आई-डोडा डार्लिंग”, असे कॅप्शन तिने हे फोटो शेअर करतेवेळी दिले आहे.
-
त्यासोबतच तिने तिच्या आईसोबत केलेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पुन्हा शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोत ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन आणि वृंदा राय दिसत आहेत.
-
तर दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन आणि वृंदा राय या दिसत आहे.
-
हे फोटो त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यानचे आहेत.
-
ऐश्वर्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या राय बच्चन / इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा