-
हॉरर कॉमेडी असलेला ‘भूल भूलैय्या २’ हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
-
२० मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.
-
सध्या बाॅक्स ऑफिसवर याच चित्रपटाचा बोलबाला आहे.
-
‘भूल भूलैय्या’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
-
‘भूल भूलैय्या’मध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्या भूमिका होत्या.
-
‘भूल भुलैय्या २’ चित्रपटात बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.
-
कार्तिक आणि कियाराला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत.
-
‘भूल भूलैय्या’ चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
-
चित्रपटात बाॅलिवूड अभिनेत्री तब्बूने ‘अंजुलिका’ ही भूमिका साकारली आहे.
-
ही भूमिका साकारण्यासाठी तब्बूने २ कोटी रुपये मानधन घेतले असल्याची माहिती आहे.
-
अभिनेता राजपाल यादव विनोदी भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो.
-
‘भूल भूलैय्या’ चित्रपटात त्याने पंडितची भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
-
‘भूल भूलैय्या २’ मध्येदेखील राजपाल यादव ‘छोटे पंडित’ या विनोदी भूमिकेत आहे.
-
ही भूमिका साकारण्यासाठी राजपालने १.२५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
अभिनेता संजय मिश्रांनी चित्रपटात ‘बडे पंडित’ ही भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटासाठी त्यांनी ८० लाख रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे.
-
चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या कियारा अडवाणीने ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
या चित्रपटात कियाराने ‘रीत ठाकूर’ ही भूमिका साकारली आहे.
-
अभिनयाची छाप पाडून बाॅलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन ‘भूल भूलैय्या २’ चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
-
‘भूल भूलैय्या २’मध्ये कार्तिक ‘डॉ.नील’ च्या भूमिकेत आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिकने चित्रपटासाठी १५ कोटी रुपये मानधन घेतले आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा