-
सध्या कलाविश्वात वेब सीरिज, सिनेमातील बोल्ड सीन्सची जबरदस्त चर्चा होताना दिसतेय.
-
आव्हानात्मक भूमिका आणि कामाचा एक भाग म्हणून अनेक अभिनेत्री वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देताना दिसत आहेत.
-
यापूर्वीही अनेकदा सिनेमातील बोल्ड सीन्सवर चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
-
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री सिनेमात बोल्ड सीन्स दिल्यामुळेच ओळखल्या जाऊ लागल्या.
-
चित्रपटातील आयटम सॉंग आणि बोल्ड सीन्समुळे अनेक अभिनेत्री रातोरात प्रसिद्धीझोतात आल्या.
-
परंतु असं असलं तरीही त्यांना कलाविश्वात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
-
सिनेमात बोल्ड सीन्स देऊनही सुपरफ्लॉप ठरलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.
-
मलिका शेरावत : बोल्ड सीन्सचा भडिमार असलेल्या ‘मर्डर’ या चित्रपटातून अभिनेत्री मलिका शेरावतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
या चित्रपटातील तिच्या बोल्डनेसची खूप चर्चा रंगली होती.
-
यानंतरही मलिकाने अनेक चित्रपटांत बोल्डनेसचा तडका लावला.
-
परंतु तरीदेखील तिला बॉलिवूडमध्ये फार चांगली कामगिरी करता आली नाही.
-
उदिता गोस्वामी : ‘जहर’, ‘अकसर’ सारख्या चित्रपटांतून बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे उदिता गोस्वामी.
-
बोल्ड सीन्समुळे रातोरात प्रसिद्धीझोतात आलेल्या उदिताचं बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरलं.
-
तनुश्री दत्ता : ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटामुळे अभिनेत्री तनुश्री दत्ता स्टार झाली होती.
-
चित्रपटातील अभिनेता इमरान हाशमीसोबतच्या बोल्ड सीन्सची खूप चर्चा रंगली होती.
-
असं असताना देखील तनुश्रीने बॉलिवूडला रामराम ठोकल्यामुळे तिच्या करिअरला ब्रेक लागला.
-
कोइना मित्रा : आयटम सॉंग आणि बोल्डनेसमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे कोइना मित्रा.
-
तिचं ‘साकी साकी’ हे आयटम सॉंग प्रचंड गाजलं होतं. परंतु, नंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.
-
शार्लिन चोप्रा : ‘टाइमपास’, ‘रेड स्वास्तिक’ चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे शार्लिन चोप्रा.
-
शार्लिनचं बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरलं.
-
मेघना नायडू : हवस या चित्रपटात बोल्ड सीन्स दिल्यामुळे मेघना नायडू बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली होती.
-
परंतु, अचानक ती बॉलिवूडमधून दिसेनाशी झाली.
-
गीता बसारा : ‘द ट्रेन’ चित्रपटात बोल्ड सीन्स दिल्यामुळे मॉडेल आणि अभिनेत्री गीता बसारा चर्चेत आली होती.
-
परंतु, बॉलिवूडमध्ये गीता काही खास कामगिरी करू शकली नाही.
-
क्रिकेटर हरभजन सिंहसोबत लग्न केल्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश