-
प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
-
चित्रपटातील कलाकारांच्या फर्स्ट लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
चित्रपटात प्रविण तरडे ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ या मुख्य भूमिकेत आहेत.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गश्मीर महाजनीने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे.
-
‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज’ अशा दुहेरी भूमिकेत गश्मीर दिसणार आहे.
-
दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडेंनी चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ चित्रपटात अभिनेत्री श्रुती मराठे ‘महाराणी सोयराबाईं’च्या भूमिकेत दिसणार आहे.
-
तर अभिनेता उपेंद्र लिमये ‘बहिर्जी नाईक’ यांच्या भूमिकेत आहे.
-
लोकप्रिय अभिनेता राकेश बापट चित्रपटात खलनायिकाच्या भूमिकेत आहे. त्याने ‘सर्जा खान’ची भूमिका साकारली आहे.
-
बहादुर
-
अभिनेता अंगद म्हसकर ‘कवी कलश’ यांच्या भूमिकेत आहे.
-
स्वराज्याचा हेर असणारऱ्या ‘नंदी’ची भूमिका देवेंद्र गायकवाड याने साकारली आहे.
-
बाल कलाकार आरुष केदार सोमण ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या भूमिकेत आहे.
-
चित्रपटात ‘महाराणी ताराराणीं’ची भूमिका अभिनेत्री आर्या रमेश परदेशी हिने साकारली आहे.
-
अभिनेता रमेश परदेशी ‘येसाजी कंक यांच्या’ भूमिकेत आहे.
-
महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्वाचे शिलेदार ‘दत्ताजी मंत्री’ यांची भूमिका विष्णु मनोहर यांनी साकारली आहे.
-
अभिनेता प्रतिक मोहिते ‘सूर्याजी मालुसरें’च्या भूमिकेत दिसणार आहे.
-
अमोल धावडे ‘सर्जेराव’च्या भूमिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो : सरसोनापती हंबीरराव/ इन्स्टाग्राम)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”