-
अभिनेत्री अक्षया देवधरचे पारंपरिक लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
एका कार्यक्रमानिमित्त चंदेरी रंगाचा शालू अक्षयाने परिधान केला होता.
-
यामध्ये ती फारच सुंदर आणि मनमोहक दिसत होती.
-
नाकात नथ, केसात गजरा आणि हिरव्या बांगड्यांनी तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घातली.
-
पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडेल असाच तिचा हा लूक आहे.
-
ताईच्या सासूबाईंचा शालू मी परिधान केला असल्याचं अक्षयाने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
-
अक्षयाच्या या नव्या लूकला नेटकऱ्यांची देखील चांगलीच पसंती मिळताना दिसते.
-
अक्षयाला पारंपरिक लूकमध्ये पाहणं नेटकरी पसंत करतात.
-
तिने भरजरी शालूवर परिधान केलेले दागिने देखील विशेष लक्षवेधी आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स