-
श्रुती हासन हे सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. ती हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच दक्षिण चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे.
-
श्रुती ही ज्येष्ठ अभिनेते कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वीच कमल आणि सारिका यांचा घटस्फोट झाला.
-
आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे श्रुतीने अजून लग्न केले नाही का? श्रुतीनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचे उत्तर दिले आहे.
-
काही वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर कमल हसन आणि सारिका या दोघांनी १९९८ मध्ये लग्न केले. कमल आणि सारिकाचे लग्न होण्यापूर्वी श्रुतीचा जन्म झाला होता.
-
२००४ मध्ये कमल हासन आणि सारिका यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आणि वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
-
श्रुती हसन ३७ वर्षांची झाली आहे. श्रुती अजूनही अविवाहित आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल सांगितले.
-
श्रुती म्हणाली- आयुष्याच्या या टप्प्यावर मी फक्त लग्नाचा विचार करून घाबरते. हे असे काहीतरी आहे जे मी करण्यास सहमती देऊ शकत नाही.
-
या मुलाखतीत जेव्हा श्रुतीला आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे लग्नापासून लांब जात आहे का, असे विचारण्यात आले. यावर श्रुती म्हणाली- मला माझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या फक्त चांगल्या गोष्टी आठवतात.
-
श्रुतीने स्पष्टपणे सांगितले की, ते लग्नानंतर एकत्र नाही राहू शकले म्हणून याचा अर्थ माझा लग्नावरील विश्वास उडाला असे नाही. जेव्हा त्यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते तेव्हा ते एक चांगले जोडपे होते.
-
यावेळी श्रुती म्हणाली कि, माझ्या मते माझ्या आई-वडिलांच्या लग्नामागे एक सुंदर हेतू होता. जेव्हा लग्नात सर्व काही ठीक होते, तेव्हा ते एक आश्चर्यकारक लग्न होते आणि त्यात मला तेच चांगले दिसते. कधी काही नाती काम करतात तर कधी नाहीत.
-
मी नेहमी चांगल्या बाजूकडे पहिले आहे. माझ्या आई-वडिलांनी अनेक चढउतार पार केले आहेत.
-
तर श्रुती सध्या शंतनू हजारिकाला डेट करत आहे. (all photos: @shrutizhassan/ instagram)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल