-
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकतंच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
-
रोखठोक संवाद आणि जबरदस्त अॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे साकारत आहेत.
-
हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस उलटला असला तरी अनेकजण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
-
नुकतंच विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी ओळख असलेला अभिनेता कुशल बद्रिकेने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
-
कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाच्या पोस्टरसोबत काही फोटो शेअर केले आहे.
-
यातील पहिल्या फोटोत तो सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या पोस्टरसोबत उभा राहिला आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत कुशल बद्रिके, सिद्धार्थ जाधव आणि विजू माने हे कलाकार त्याच्यासोबत दिसत आहे.
-
या फोटोला कॅप्शन देतेवेळी कुशलने त्याला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.
-
“हंबीरराव” एक दैदीप्यमान सिनेमा. एखादं ऐतिहासिक पुस्तक वाचताना, आपल्या डोळ्यांसमोर काही चित्र उभी राहतात, काही प्रसंग तर चक्क दिसू लागतात, पण “हंबीरराव” हा सिनेमा आपल्याला इतिहासात घेऊन जातो”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
-
“आपण आपलं अस्तित्व विसरून इतिहास जगू लागतो, त्या लढायांमध्ये एखादी तलवार हाती घेऊन आपणही “स्वराज्याच्या पायरीला” शत्रूचा रक्ताने आणि आपल्या प्राणाने अभिषेक घालावा असं वाटत राहतं”, असेही तो म्हणाला.
-
“प्रवीण तरडे मित्रा ह्या सिनेमासाठी मी तुझा आणि तुझ्या निर्मात्यांचा, कायम ऋणी राहीन”, असेही त्याने यात म्हटले आहे.
-
“इतिहास आपल्याला जगायला शिकवतो”, आपल्या मुलांना जर कसं जगायचं ? हे शिकवायचं असेल तर त्यांना सर सेनापती “हंबीरराव” नक्की दाखवा !!, असा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला आहे.
-
दरम्यान ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका अशी दोन्ही आव्हानं पेलली आहेत.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल