-
झी मराठीवरील “कसे आहात मंडळी मजेत ना? आणि हसताय ना? हसायलाच पाहिजे…” असं आपुलकीने विचारत वर्षानुवर्षे प्रेक्षकांचा अविरत आणि सातत्याने भरभरून मनोरंजन करणारी टीम म्हणजे चला हवा येऊ द्या.
-
डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके हे सहा अवलिया इतर कलाकारांसोबत अनेक विनोदी स्किट सादर करत आजपर्यंत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत.
-
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे.
-
या मंचावर प्रेक्षकांचे आवडते कलाकार देखील हास्याचा डोस अनुभवण्यासाठी सज्ज होतात.
-
या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येत असतात.
-
या आठवड्यात अशोक मामा आणि त्यांच्या सोबत काम केलेले सिनेसृष्टीतील त्यांचे सहकलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत.
-
निमित्त आहे अशोक मामांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीचा सोहळा.
-
अशोक सराफ यांचा ४ जून रोजी वाढदिवस असतो.
-
या महान विनोदवीराने आपल्या अभिनय क्षेत्रातील अफाट योगदानाने प्रेक्षकांचं ५ दशकं मनोरंजन केलं, त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हा दिवस सोहळा म्हणून साजरा केला जाणार आहे.
-
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.
-
अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच टिव्ही मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.
-
अशोक मामा यांच्यासोबत त्यांच्या सौ. निवेदिता सराफ, आणि त्यांच्यासोबत मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे, अलका कुबल, निशिगंधा वाड या देखील उपस्थित होत्या.
-
यांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांनी कल्ला केला आणि अशोक मामांच्या चित्रपटावर आधारित एक प्रहसन सादर करून सगळ्यांना लोटपोट केलं.
-
अशोक सराफ यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकप्रेक्षकांची मन जिंकून घेतली.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच